अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, त्याचवेळी त्यांना मी बोललो होतो की, तुम्ही अध्यक्ष व्हा मी विरोधी पक्षनेता होतो. मात्र त्यांनी सांगितलं की माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे. अध्यक्ष पदांमध्ये रस नाही. ते मला बोलले असते तर मी स्वतः षण्मुखानंद येथे जाहीर केलं असतं, मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. अजित पवार यांना अध्यक्ष करा,” असा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, ”षण्मुखानंद येथील सभेनंतर शरद पवार यांनी मला फोन केला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं अजित पवार याना अध्यक्ष करा मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. मी त्यानंतर स्वतः भेटून सांगीतल त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार याना अध्यक्ष करण्यासाठी बैठक देखील बोलावली परंतु त्याच आधी 2 जुलैला ही घटना घडली. त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला 2019 च्या निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले, ”2019 मध्ये सगळे पक्ष सोडून चालले होते. मात्र मी भाषणात म्हणालो होतो की, आपल्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यावेळी आपण 54 आमदार निवडून आणले. आपला पक्ष मोठा करायचा असेल तर त्यासाठी लोकांपर्यंत पोहचायला हवं आणि त्यासाठी परिवार संवाद यात्रा काढली होती. आमचा पक्ष एक असता तर आपली एक हाती सत्ता आणली असती. 2024 साली आपला पक्ष मोठा झाला पाहिजे असं स्वप्न होतं.”