“अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात आहेत. मात्र त्याच्या खोलात मी आत्ता जाणार नाही. आज त्यांची अडचण होऊ नये असं मला वाटतं आहे. त्यांची काही कामं आहेत जी झाली पाहिजेत. त्यांच्या मार्गांमध्ये अडथळा निर्माण करणार नाही. योग्य वेळी आली की आपण पाहू. ” असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असंही म्हटलं आहे. आमदार परत आले तर त्यांना पक्षात घेणार का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “पक्षात परत घ्यायचं का? त्यांचा निर्णय काय घ्यायचा हे सगळं शरद पवार ठरवतील. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र अजित पवार गटातल्या आमदारांची परत येण्याची इच्छा आहे.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अजितदादांबरोबरच्या अनेक आमदारांना मोठ्या साहेबांकडे परतीचे वेध…
- Advertisement -