Saturday, May 18, 2024

लंके अजितदादांकडे गेले होते तर आमचे लोकसभेच आधीच ठरलं होतं…जयंत पाटील यांचा मोठा खुलासा

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यानंतरही नीलेश लंके यांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी कशी दिली? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. आमचे आणि लंके यांचे सहा महिन्यांपूर्वीच ठरले होते. योग्य वेळ येताच लंके यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून पक्षात प्रवेश आणि उमेदवारीही दिली,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

लंके यांच्या प्रचारासाठी नगरला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले असले तरी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना पक्षात परत घेऊन उमेदवारी दिली’.अजित पवार यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आपली आमदारकी जाते की काय अशी शंका लंके यांच्यासह इतर आमदारांना होती. अजित पवार यांनी बंड करून सत्तेत सहभागी झाले, ही घटना अत्यंत अचानक घडली होती. त्यामुळे अनेक आमदारांना मोठा प्रश्न पडला होता. सत्तेमध्ये सामील होण्याच्या पत्रावर आमदारांनी सह्या केल्या होत्या. आता भूमिका बदलल्यावर आपले आमदारपद जाईल, अशी त्यांना भीती होती. लंके आणि खासदार अमोल कोल्हे मात्र आमच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वीच लंके पवार गटात येणार हे ठरलं होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles