प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहण्यासाठी आपण ट्रॉली, सुटकेस किंवा बॅग यांना कुलूप किंवा साखळी लावून ठेवतो. प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहण्यासाठी आपण ट्रॉली, सुटकेस किंवा बॅग यांना कुलूप किंवा साखळी लावून ठेवतो. एक व्यक्ती पेनच्या मदतीने बॅगेची चेन तोडते आणि आतून वस्तू बाहेर काढते. यानंतर, ती व्यक्ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बॅगची चेन अगदी जशीच्या तशी बंद करते. त्यामुळे प्रवाशांना कल्पनासुद्धा नसते की, त्यांचे सामान चोरी करण्यात आले आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्टेशनवर लोकांची एकच गर्दी जमली आहे. चेन लावलेल्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोर कसा चोरतो याची एक झलक दाखवण्यात आली आहे. एक पेन घेऊन या चेन लावलेल्या बॅगला उघडलं जात आहे. बॅगेच्या चेनच्या अगदी मधोमध हा पेन घुसवून ही चेन पूर्णपणे तोडून सामान अगदी सहज काढले जाते आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
कुलुप लावलेल्या बॅगेतून अशी होते चोरी…हातोहात मौल्यवान चीजवस्तू लंपास
- Advertisement -