झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार कमलेश कुमार सिंह हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची समोर आली आहे.
भाजपाचे झारखंडचे निवडणूक सह-प्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची आमदार कमलेश कुमार सिंह यांनी रांची येथे भेट घेतली असून कमलेश कुमार हे ३ ऑक्टोबर रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कमलेश कुमार सिंह हे पलामूमधील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कमलेश कुमार हे १९९९ पासून झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) काम करतात. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहेत.