आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली. प्रख्यात नृत्यांगना आणि ‘स्मितालय’च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत्य निर्णय समोर आणला आहे.
झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्याबद्दल खुद्द झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं…..सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुद्धा खुश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर…. आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार….” असं त्यांनी लिहिलं आहे.