Jio नं आज आपले नवीन प्लॅन्स घोषित केले आहेत. पूर्णपणे हे कंपनीचे नवीन प्लॅन नाहीत तर कंपनीनं आपल्या जुन्या प्लॅनची किंमत आता वाढवली आहे. हा नवीन किंमती 3 जुलैपासून लागू होतील. Jio कंपनीनं आपल्या युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या प्लॅन्सच्या दरवाढीची घोषणा केली आहे. 155 रुपयांची किंमत आता 189 रुपये झाली आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो, ज्यात 2GB डेटा मिळते.
209 रुपयांचा प्लॅन 249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1GB डेली डेटा मिळतो.
239 रुपयांचा प्लॅन 299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1.5GB डेली डेटा मिळतो.
479 रुपयांचा प्लॅन 579 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1.5GB डेली डेटा मिळतो.
533 रुपयांचा प्लॅन 629 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2GB डेली डेटा मिळतो.
395 रुपयांचा प्लॅन 479 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 6GB डेली डेटा मिळतो.
666 रुपयांचा प्लॅन 799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1.5GB डेली डेटा मिळतो.