Jio Recharge नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार New Year 2024 Gift आणले आहे.
रिलायन्स जिओकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्लॅन्स आहेत. लाँग प्लॅन एखाद्या वेळी थोडा महाग वाटू शकतो, परंतु त्यांचे बरेच फायदे आहेत. जिओ आता आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत आहे. व्हॅलिडिटीसोबतच कंपनी ग्राहकांना एक्स्ट्रा 75GB डेटा देखील देत आहे. या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे. तुम्हाला हा प्लॅन एकावेळी महाग वाटू शकतो, पण त्याची रोजची किंमत 8 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडिटी देते, परंतु नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते. अशा प्रकारे तुम्ही 389 दिवस नेहमी रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.जिओच्या या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 912.5GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरू शकता. ज्यांना अधिक डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे.