Jito Connect 2022 Pune…प्रत्येकाला व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने नवी दिशा मिळेल

0
716
JITO-CONNECT-2022 Pune

Jito Connect 2022 Pune

पुण्यातील ‘जितो कनेक्ट’व्दारे प्रत्येकाला व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने नवी दिशा मिळेल : विजय भंडारी
जितो अहमदनगरतर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात राष्ट्रीय पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन
JITO CONNECT 2022 PUNE

नगर (सचिन कलमदाणे) : व्यापार क्षेत्रात असलेल्या जैन समाजाने काळानुरुप बदल अंगिकारणे आवश्यक आहे. गेल्या दशकभरात डिजीटल तंत्रज्ञानामुळे व्यापारातही आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांशी प्रत्येकाने जुळवून घेतले तर व्यापार, व्यवसायात आणखी उत्तुंग शिखर गाठणे शक्य आहे. यासाठी पुण्यात होणारा तीन दिवसीय जितो कनेक्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. 850 हून अधिक स्टॉल्स, नवनवीन स्टार्टअप्स, बिझनेस आयडिया, फ्रँचाईजी मॉडेल, जगभरातील नामवंत मोटिव्हेशनल स्पीकर्स जितो कनेक्टमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे याठिकाणी प्रत्येकाला व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने नवी दिशा मिळेल, मोठी भरारी घेण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास जितो ऍपेक्सचे व्हाईस चेअरमन विजय भंडारी यांनी व्यक्त केला.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)च्यावतीने पुणे येथे दि.6,7 व 8 मे रोजी भव्य अशा जितो कनेक्ट महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी जितो अहमदनगरतर्फे केशरगुलाब मंगल कार्यालय येथे जितोचे सदस्य तसेच जैन बांधवांसाठी स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी विजय भंडारी बोलत होते. कार्यक्रमास अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत, जितो ऍपेक्स डायरेक्टर इंदर छाजेड, रमेश गांधी, जितो अपेक्स युथ विंग चेअरमन धीरज छाजेड, रेस्ट ऑफ महाराष्ट्र चेअरमन कांतीलाल ओसवाल, चीफ सेेके्रटरी अजय मेहता, जॉइंट सेके्रटरी गौतम मुनोत, जितो पुणेचे चेअरमन ओमप्रकाश रांका, सेक्रेटरी पंकज कर्नावट, जितो कनेक्टचे मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, जितो कनेक्ट समन्वयक राजेश साखला,
सी.ए.रमेश फिरोदिया, सुरेश कांकरिया, जवाहर मुथा, संजय चोपडा, राजेंद्र चोपडा, नगरसेवक विपुल शेटिया, मर्चंटस्‌ बँकेचे संचालक सी.ए.आय.पी.अजय मुथा, संजय बोरा, सी.ए.मोहन बरमेचा, संजीव गांधी, कमलेश भंडारी, मिनाताई मुनोत, अशोक गांधी, जितो पुणेचे डायरेक्टर मनोज छाजेड, जितो अहमदनगरचे चेअरमन अमित मुथा, सेक्रेटरी प्रितेश दुगड, युथ विंग चेअरमन तुषार कर्नावट, सेक्रेटरी गौतम मुथा, लेडीज विंगच्या चेअरमन मेघना मुनोत, सेक्रेटरी संगिता मुथियान आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जितोचे नवीन सदस्य चीफ पॅट्रॉन अमित पोखरणा, पॅट्रॉन सचिन कटारिया व मनोज चोपडा यांना मान्यवरांच्या हस्ते सदस्यत्व बहाल करण्यात आले.
प्रारंभी गौतम मुनोत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जैन समाज हा व्यापारात देशात प्रथम क्रमांकावर आहे. व्यापार, व्यवसायाला काळानुरुप चालना मिळण्यासाठी जितो जगभरात कार्यरत आहे. याशिवाय जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, साधूसाध्वीजींच्या आरोग्यासाठी श्रमण आरोग्य योजना, कौशल्य विकासासाठी सेंटर फॉर एक्सलन्स, इंडस्ट्रीतील जैन बांधवांसाठी जितो बिझनेस नेटवर्क असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
ओमप्रकाश रांका यांनी सांगितले की, तब्बल 15 लाख स्क्वेअर फूट परिसरात जितो कनेक्ट होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन माध्यमातून जितो कनेक्टचे उद्घाटन करून मार्गदर्शन करणार आहेत. यातूनच हा महामेळावा किती भव्यदिव्य असेल याची कल्पना प्रत्येकाला येईल. जितो कनेक्टमध्ये बीटूबी पॅव्हेलियन, बिझनेस कोर्ट, ज्वेलरी पॅव्हेलियन,जैन पॅव्हेलियन असणार आहे. नगरमध्ये जितोचे कार्य अतिशय उत्तम रित्या चालू आहे. त्यामुळे नगरमधून जास्तीत जास्त जैन बांधवांनी पुण्यातील या तीन दिवसीय जितो कनेक्टला आवर्जून हजेरी लावावी, असे आग्रहाचे निमंत्रण आहे.
स्वागत करताना अमित मुथा यांनी जितो कनेक्टमध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला. शेवटी प्रितेश दुगड यांनी आभार मानले.

जितो कनेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Click and multiply your business potential.
Use the links below to Download the App Now :
Android : https://tinyurl.com/connect22android

iOS : https://tinyurl.com/connect22apple

PLS REGISTER ON THE LINK BELOW WITHOUT FAIL

http://connect2022.jito.org