कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. रविवारी नाशिकमध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर दोन रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आलंय. शहरात कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी राज्यात कोरोना व्हायरसचे १३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आज नव्या १३१ करोनाबाधित रुग्णांची नोंद. आता राज्यात एकूण ७०१ रुग्ण. नव्या JN.1 व्हेरियंटचे २९ रुग्ण. राज्यातील सर्वाधिक १९० रुग्ण ठाण्यात. मुंबईत १३७, पुण्यात १२६ तर अहमदनगरला २ रुग्ण.