जिल्हा परिषद शिक्षण विभागात विविध पदे भरती केली दाणार आहे. या योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषद येथे तुम्हाला नोकरी मिळू शकते. या नोकरीसाठी विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.१२वी पास/आयआटीआय/पदवी किंवा पदव्युतर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
जिल्हा परिषदेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाच्या वेबसाइटवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही नोकरी देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी १२वी पास उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय पदवी प्राप्त उमेदवाराला ८ हजार रुपये तर पदव्युतर उमेदवाराला १० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
Job requires