Home राज्य महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी करा अर्ज

महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी करा अर्ज

0

महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या मोठ्या विभागात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत जाहिरात जलसंपदाविभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.कनिष्ठ अभियंता या पदासाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा जलसंपदा विभागातील खालील पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा. सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी-२, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी या पदासाठी अर्ज करु शकतात. पुणे शहरात तुम्हाला नोकरीसाठी जावे लागेल.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे. जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, उजनी कालवा, विभाग क्रं. ९ मंगळवेढा-४१३३०५ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. तसेच तुम्ही ujjanimangalwedha@gmai.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवू शकतात. या नोकरीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. मुलाखतीची माहिती तुम्हाला मेलद्वारे देण्यात येईल.

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतदेखील विविध पदांसाठी भरती सुरु आहे. तब्बल १८५६ पदांसाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ९ सप्टेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.