इंग्लंडच्या जो रुटचा जगातील टॉप 4 फलंदाजांमध्ये समावेश होतो.पण इंग्लंडच्या या टॉप खेळाडूसाठी वर्ल्ड कप 2023 वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीय.जो रुट नेदरलँड्स विरुद्ध दमदार फलंदाजी करेल, अशी इंग्लिश चाहत्यांना अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. जो रुट नेदरलँड्स विरुद्ध 28 धावांवर आऊट झाला.जो रूट क्रीजवर सेट झाला होता. तो 28 धावांवर फलंदाजी करत होता. टीमचा रनरेटही चांगला होता. पण रुटला अचानक रिव्हर्स स्कूपचा फटका खेळण्याचा मोह झाला. त्याने वॅन बीकच्या गोलंदाजीवर हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रुटसोबत जे घडलं, त्यामुळे इंग्लंडचे चाहतेही चक्रावून गेले. रुटने बीकच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चेंडू त्याच्या दोन पायांमधून गेला. रुटचा थेड मिडिल स्टम्प उडाला.
Video इंग्लडचा जो रुट..सूर्याकुमार स्टाईल फटका मारायला गेला आणि घडलं भलतच..
- Advertisement -