अहमदनगर जिह्याचे विभाजन करायचे नाही, असे ज्यांच्या मनात आहे ते सत्तेतून दूर झाल्यावरच विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येऊन मार्गी लागेल, असा टोला भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान 2014 ला आणि 2019 ला माझे नाव चर्चेत होते. मात्र, 2014 ला मला उमेदवारी मिळाली नाही. आणि 2019 ला मी नाही म्हणालो. पण 2024 ला मला उमेदवारी मिळाली तर लोकसभा निवडणूक लढवेल असे म्हणत खासदार सुजय विखे यांना देखील डिवचण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेली अनेक दिवस अहमदनगर भाजपमध्ये विखे पाटील आणि प्रा. राम शिंदे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.