एका हटके देसी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. कारण- यात एका व्यक्तीने विजेचा बल्ब सुरू करण्यासाठी स्विच बोर्डवर बटन नाही, तर चक्क पाण्याच्या नळाचा वापर केला आहे;
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलेत, तर तुम्हाला त्यात एक स्विच बोर्ड दिसेल; ज्यावर लाईट, पंखा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्य वापरासाठी सुमारे १० स्विच आहेत. त्यावर एक होल्डरही बसवला आहे. प्रथमदर्शननी सर्व काही सामान्य दिसते; पण जेव्हा नजर स्विच बोर्डवरील पाण्याच्या नळाकडे जाते तेव्हा मात्र धक्काच बसतो. त्यावेळी स्विच बोर्डवर पाण्याच्या नळाचा काय उपयोग, असा प्रश्न पडतो. पण, जुगाडू व्यक्तीने नळाचा स्विच बोर्डवर अशा काही प्रकारे वापर केला आहे की, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्यक्ती पाण्याचा नळ जसा फिरवते, तसा तो बल्ब चालू-बंद होतो.