व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला एक मोठा चमचा गव्हाचे पीठ घेते. या पिठामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकते. त्यानंतर त्यामध्ये शाम्पू टाकते (तुम्ही वापरत असलेला कोणताही शाम्पू टाकू शकता) त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू चांगला एकत्रित करते आणि स्क्रबच्या मदतीने या मिश्रणाने घरातील भांडी घासताना दिसते.बेसिन स्वच्छ करताना दिसते महिला सांगते की शाम्पू गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करताना पेस्ट तयार करू नका. पावडर असू द्या. या पावडरच्या मदतीने सर्व काळपटपणा दूर होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
- Advertisement -