व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक तरुणी बंजी जंपिंगचा थरार अनुभवताना दिसतेय. पण, हे साधंसूधं बंजी जंपिंग नाही. हे करण्यासाठी जितक्या साहसाची गरज आहे, तितकाच धोकाही आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी उंचावरून खाली धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यावर प्रशिक्षकासोबत दिसते आहे. यावेळी तरुणीच्या पायाभोवती सेफ्टी रोप बांधला जातो, यानंतर तो प्रशिक्षक तिला धबधब्यातून खाली ढकलतो. ढकलल्यानंतर तरुणी कोसळत्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने झेपावते आणि नंतर हवेत स्विंग करू लागते, अशाप्रकारे ती पुन्हा स्विंग करत धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाखाली येते. अशाप्रकारचे धोकादायक बंजी जंपिंग पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
तरुणीला धबधब्यावरून दिला धक्का,बंजी जंपिंगचा थरार! काळजाचा ठोका चुकवणारा Video
- Advertisement -