अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. यावेळी भाजपकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यात आहे. यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपकडून काळे झेंडे…महायुतीत तणाव
- Advertisement -