सोशल मीडियावर दरदिवशी विचित्र खाद्यप्रयोग व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील एक खाद्यपदार्थ विक्रेता चिक्की चाट बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. डिश हे मुळात पापडी चाट आणि चिक्कीचे मिश्रण करून तयार केला आहे. ज्यामध्ये विक्रेता पापडीच्या जागी गूळ आणि शेंगदाणा चिक्की वापरताना दिसत आहे. व्हिडिओचे कॅप्शन पाहून तो गुजरातमधील सुरतमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे समजते.
व्हिडिओची सुरुवात विक्रेत्याने चिक्कीचे दोन तुकडे केल्याचे दिसते. या चिक्कीवर आलू भुजिया टाकतो. पुढे जे घडते ते कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण विक्रेता गोड चिक्कीवर चक्क मसालेदार हिरवी चटणी आणि लिंबाच्या रस टाकतो.. पुन्हा एकदा भुजिय टाकतो आणि चिरलेली कोथिंबीर घालतो. त्यानंतर तो त्यात गोड चटणी घालतो. एका ग्राहकाला खायला देतो.