हल्ली पाणीपुरीचे अनेक नवनवीन प्रकार दिसून येतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका कढी पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एका पाणीपुरी विक्रेत्याने सुरुवातीला हातात पुरी घेतली आहे आणि तो त्यात उकडलेले चणे, बुंदी टाकून ही पाणीपुरी चिंचेच्या पाण्यात नाही तर कढीत बुडवून सर्व्ह करताना दिसत आहे. या व्हिडीओवर ‘कढीवाली पाणीपुरी, अहमदाबाद’ अशी कॅप्शन लिहिलेली आहे.
- Advertisement -