Saturday, January 25, 2025

सरपंचाचे भर दुपारी अपहरण करून खून; सरपंच परिषदेचा मोठा निर्णय

बुधवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा सरपंच परिषदेचा निर्णय सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

केज – तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळून आला असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी (दि.०९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संतोष देशमुख यांचे टोलनाका जवळून अपहरण झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (एमएच ४४ बी ३०३२) मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासह मस्साजोगकडे जात होते. मार्गात डोणगाव टोलनाका जवळ चारचाकी वाहनातून आलेल्या आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्या गाडीतून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना ओढून काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांना बळजबरीने गदिन बसवून केजच्या दिशेने घेऊन गेले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली. सदर तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची दोन पथके तातडीने देशमुख यांच्या शोधासाठी निघाली. मात्र काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केज पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच अधिकृत माहिती समोर येऊ शकेल. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरपंच परिषद परिषद मुंबई महाराष्ट्र च्या वतीने या घटनेचा निषेध आणि मारेकऱ्यांना अटक करावे व मागचा मास्टर पोलिसांनी शोधून काढावा या मागणीसाठी बुधवारी बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद निर्णय -दत्ता काकडे, प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles