Saturday, December 9, 2023

Video: मोबाईल बघण्याच्या नादात पायऱ्याच दिसल्या नाहीत; काजोल स्टेजवरून पडली खाली

देशभरात नवरात्रीची धूम आहे. सेलिब्रिटी नवरात्रीमध्ये देवींच्या पूजेत सहभागी होत असतात. कालीमातेचे पूजेत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री काजोने मुलगा युग आणि कुटुंबासह देवीच्या पूजेसाठी एका मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दरम्यान फोनच्या नादात असलेल्या काजोलचा अपघात झाला.

काजोल पूजेच्या मंडपातील स्टेजवर होती. तिचे संपूर्ण लक्ष तिच्या फोनमध्ये होते. ती चालत – चालत स्टेजच्या कडेला गेली आणि खाली पडली. स्टेजची उंची कमी असल्याने ती बचावली. खाली असलेल्या लोकांनी तिला सावरले. तिचा मुलगा युग देखील तिच्या मदतीला पुढे सरसावला. पडल्यामुळे काजोलच्या पायाला दुखापत झाली आहे.

काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. ‘काजोल नेहमीच धडपडतच असते. मॅडम जरा सांभाळून.’ ‘ही नेहमीच धडपडत असते’, ‘काही नाही हे सर्वांसोबाबत होत, सगळं लक्ष फोनमध्ये असल्यावर आणखी काय होणार’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी काजोलच्या या व्हिडीओ केल्या आहेत.

काजोल नेहमीच पारंपरिक लूकमध्ये देवीच्या पूजेत सहभागी होत असते. यावेळी देखील तिचे पिवळ्या आणि गुलाबी साडीमधील लूक तिच्या फॅन्सला आवडले आहेत.

काजोलच्या काही महिन्यांपूर्वी ‘द ट्रायल’ या वेबसीरीजचा दुसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरीजमध्ये काजोलने वकिलाची भूमिका साकारली आहे. आता काजोल ‘दो पत्ती’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच काजोल आपल्याला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d