Tuesday, December 5, 2023

कालीचरण महाराज राजकारणात येण्यास उत्सुक, निवडणूक लढविण्याचे संकेत…

कालीचरण महाराज हे रविवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांनी हिंदू समाज बांधवाना मार्गदर्शनपर भाषण केले. भाषणानंतर कालीचरण महाराजांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राजकारणात रुची दाखवली.जनतेची इच्छा असेल तर जरूर निवडणूक लढवेन असे कालीचरण महाराजांनी उत्तर दिले. पण मी खूप कडवा आहे, मला तिकीट कोण देणार असेही स्पष्ट सांगितले. राजकारणात कडवे लोक चालतील का,मी स्पष्टपणे आणि सत्य बोलणारा व्यक्ती आहे. मी धर्माच्या नावावर हिंदूना एकत्रित आणण्याचा कार्य करत आहे. कट्टर लोक आमदार किंवा खासदार झाली तर नक्कीच हिंदू समाजाचा उद्धार होईल. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आम्ही राजा बनणारे लोक नसून राजा बनवणारे आहोत, असे कालीचरण महाराज यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: