Saturday, October 5, 2024

भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यात गोळीबार… शिंदे गटाचे पदाधिकारी जखमी… व्हिडिओ

कल्याण : कल्याण जवळील द्वारली गाव हद्दीतील जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक बसले होते. त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी जवळील रिव्हाॅल्व्हरमधून महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार गायकवाड यांनी निशाणा साधून गोळीबार केल्याची पोलिसांनी दिली आहे.महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles