अभिनेत्री कंगना रनौत खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत होते. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंगना भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र कोणत्या जागेवरून, हे अद्याप ठरलेले नाही. अमरदीप रनौत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. पण कंगना कोणत्या मतदार संघातू निवडून लढवेल.. हे अद्याप पक्षाला ठरवायचं आहे. सांगायचं झालं तर, रविवारी कंगना हिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू मधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता ती पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचं तिच्या वडिलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
- Advertisement -