अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार कंगना रणौत हिला सीआयएसएफची महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली होती. चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. आता कंगना रणौतने या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.सीआयएसएफच्या महिला जवानाने कशामुळे कानशिलात लगावली? याबाबतही कंगनाने सविस्तर सांगितलं आहे.
नमस्कार मित्रांनो, मला फार फोन कॉल येत आहेत. शुभचिंतक आणि मीडियातील लोक माझ्यासी संपर्क करत आहेत. सर्वांत पहिल्यांदा सांगते की, मी सुरक्षित आहेत. आज जो प्रसंग झाला. तो सेक्युरिटी चेक जवळ झाला. मी तिथून जात असताना दुसऱ्या कॅबिनमधील एक महिला होती जी सीआयएसएफची सुरक्षा कर्मचारी होती. तिने मला क्रॉस करण्याची वाट पाहिली. त्यानंतर ती माझ्यासमोर आली आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मला ती शिव्या देखील देत होती. मी तिला विचारले की, तिनं असं का केलं? तेव्हा तिने सांगितलं की, मी शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते. मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटू लागली आहे.
https://x.com/KanganaTeam/status/1798697545201569904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1798697545201569904%7Ctwgr%5E619d6b42d19199a88b786ef2a883a344fa1af275%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fkangana-ranaut-posted-a-video-explaining-why-the-cisf-female-jawan-wears-earmuffs-maharashtra-politics-marathi-news-1288625
महिला जवानाने कशामुळे कानशिलात लगावली, कंगनाने व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!
- Advertisement -