शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. मुंबई शिक्षक मतदारसंघात धनलक्ष्मी आणि धनदांडग्यांनी कहर केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आता समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आता तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो, अशी भावनिक साद घातली आहे. त्यातच त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर भावनांना वाट मोकळी करुन दिली. मुंबई शिक्षक मतदार संघातून ते सलग तीन वेळा निवडून आले. 18 वर्षे त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधीत्व केले. आता मुदत संपल्याने त्यांनी सर्वांची रजा घेतली. त्यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या. त्यांनी निरोपाच्या संदेशात मनातील हे कोलाहल शब्दात बद्ध केले.
संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक – बंधू भगिनींना कपिल पाटील यांचे खुले पत्र
- Advertisement -