Monday, April 28, 2025

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात दाखल

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊद याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर तो एकमेव रुग्ण आहे. फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच तिथे प्रवेश देण्यात येत आहे. या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद होती. समाज माध्यमांद्वारे कोणतेही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी सेवा बंद करण्यात आल्याचे बोललं जातं आहे. मुंबई पोलीस अथवा गुन्हे शाखेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच पाकिस्तानी माध्यमांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles