Sunday, December 8, 2024

संत गोदड महाराज रथोत्सव….पांडुरंगाच्या पादुका कर्जत नगरीत…

पंढरीच्या पांडुरंगाचे परमभक्त सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथोत्सवासाठी पंढरपूरहून पादुका येण्याचं कर्जतकरांचं आणि भाविकांचं अनेक वर्षांचं स्वप्न आज प्रत्यक्ष साकार होत आहे. या पादुकांना रात्री चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने यथासांग स्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. अंमळनेरकर महाराज आणि सद्गुरु संतश्री गोदड महाराज मंदिराचे मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थ यांच्याहस्ते श्री पांडुरंगाच्या मंदिरात विधीवत पूजा करून या पादुकांचे कर्जतसाठी प्रस्थान ठेवले… रथोत्सवामध्ये याच पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार असून कर्जतकर नागरीक, भाविक, मानकरी, सेवेकरी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यासह सर्वांसाठीच ही अत्यानंदाची आणि समाधानाची बाब आहे.


आ.रोहित पवार

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles