कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आ.रोहित पवार उपस्थित होते. यावेळी आ. पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील कुकडी व सीनाच्या पाण्याचा मुद्दा लावून धरला. कमी दाबामुळं खरीप हंगामासाठी सोडलेल्या कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनाचं पाणी मतदारसंघातील काही गावांपर्यंत पोहचलं नाही. तसंच सिना धरणातील पाणी कमी झाल्याने कुकडी प्रकल्पातून भोसे खिंडीतून पाणी सोडण्याचीही गरज आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी एकूण 3 आवर्तनाचं नियोजन करण्याची आणि सिना कालव्याचं योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसेखिंड येथून पाणी सोडण्याची मागणी या बैठकीत केली. त्यानुसार कुकडीच्या दोन आवर्तनाची मागणी मान्य करण्यात आली. त्यातील पहिलं आवर्तन 1 डिसेंबर रोजी सुरु होईल तर तिसऱ्या आवर्तनाबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून असून याबाबतची स्वतंत्र बैठक घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलं, अशी माहिती आ.पवार यांनी दिली.
पुतण्याची मागणी आणि काकांचा लगेचच होकार….कर्जत-जामखेड मतदारसंघात कुकडीचे आवर्तन
- Advertisement -