जामखेड (नासीर पठाण ) : काहीच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ७ -११ जागा, शिंदे गटाना १७-२२ जागा तर भाजपला ६२-६७ मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली आहे. या सर्व्हेनंतर केंद्रातून हालचाली सुरु झाल्या असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवर रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, अजित पवारांनी भाजपच्या एका बड्या नेत्याने काही ठराविक जागा ऑफर केल्या. अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर देण्यात आली आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
#कर्जत_जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने #कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या #महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर #स्वाभिमान आणि #निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.