Tuesday, February 27, 2024

मी तुमच्या कामाचा गडी, ‘बाहेरचा’ गडी रात्रीतून ‘पसार’ होतो… वाढदिवसाला आ.‌राम शिंदेंची फटकेबाजी

कर्जत:

मी गरीबी पहिली…, शेतकरी पाहिलेत…, त्यांचे प्रश्न आणि दु:ख जाणून घेण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. आपल्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, मी गडी तुमच्या कामाचा आहे, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले.

आमदार शिंदे म्हणाले की, एमआयडीसी मंजूर होण्याअगोदरच रद्द कशी होईल? एमआयडीसीचा प्रस्ताव नव्याने सादर करण्याच्या सरकारने सूचना केल्या आहेत. मंत्रिपदाच्या काळात तुझा-माझा न पाहता कर्जत-जामखेडमध्ये विकासाची गंगा आणली. प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडले, दुष्काळी भागाचे चित्र बदलून एकाही गावाला टँकर लागणार नाही, असे काम करून दाखवले.

बाहेरचा गडी कामाला ठेवल्यावर अवजारे विकून रात्रीत पसार होतोय. गडी जवळचा असलेला बरा, असे म्हणत या वर्षात सर्व निवडणुका होणार आहेत. मात्र गडी आपलाच असावा, असे म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत येणाऱ्या विधानसभेला आपल्याला जनतेने निवडून द्यावे, असे अप्रत्यक्ष आवाहन शिंदे यांनी केले.

दरम्यान, आमदार शिंदे यांना खेडकरांनी सजवलेल्या बैलगाडीतून फटाक्यांची आतषबाजी करीत वाजत-गाजत कार्यक्रमस्थळी आणले. फेटा बांधून, केक कापून विधानसभा व मंत्रिपदाची गाडी असलेली प्रतिकृती देऊन त्यांचा सन्मान केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles