मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू, असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. ते करमाळ्यात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
“मी गणेशोत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो,” असा इशारा खासदार नारायण राणे यांनी इशारा दिला होता. यानंतर जरांगे-पाटील यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं होते. “अशा फुकट धमक्या नाही द्यायच्या. धमक्यांना मी घाबरत नाही. मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल,” असं जरांगे-पाटील म्हणाले होते. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत जरांगे-पाटलांवर निशाणा साधला आहे.