प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्पुरस्कार जाहीर झाली आहे. कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. बिहाराच्या राजकारण आणि समाजकारणात कर्पूरी ठाकूर यांचं नाव आदरानं घेतलं जातं.
बिहारचे माजी मुख्यमंत्री करपुरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी त्यांची ओळख होती. 17 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांचं निधन झालं. 24 जानेवारीला जननायक करपुरी ठाकूर यांची 100 वी जयंती आहे. त्याआधी केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे.