Saturday, March 2, 2024

मेहुणा नोकरीसाठी शिफारस मागायला आलं…मुख्यमंत्री असलेल्या ठाकूरांनी त्याला 50 रुपये देवून गावी पाठवलं…

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दलित आणि मागास वर्गासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना जननायक असंही म्हटलं जातं. बिहारच्या राजकारणात सलग 36 वर्षे आमदार, एकदा उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री भूषवलेले कर्पूरी ठाकुर यांची राहणीमान मात्र अत्यंत साधी होती. एवढी वर्षे राजकारणात असूनही त्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. कर्पूरी ठाकुर हे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जायचे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने त्यांनी केलं. मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी त्यांनी कधीही सरकारी वाहन वापरलं नाही. कर्पूरी ठाकुर मुख्यमंत्री असताना त्यांचा मेहुणा त्यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी आला. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली तर त्यांना नोकरी मिळेल असं त्यांने सांगत नोकरी लावून देण्याची मागणी केली. त्यावेळी कर्पुरी ठाकुर यांनी त्यांच्या खिशातून 50 रुपये काढून त्याला दिले. गावी जाऊन वडिलोपार्जित व्यवसाय कर, केस कापण्याचे साहित्य खरेदी कर असं त्याला सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles