Thursday, January 16, 2025

Ahilyanagar crime: केडगाव मध्ये दोन गटात शसस्त्र हाणामारी, गून्हा दाखल

अहिल्यानगर -केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद होवून सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी
फियादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.प्रेम जितेंद्र साठे (वय १९ रा.समतानगर। कडगाव) याच्या फिर्यादीवरून मनोज सुरेश शिरसाठ (रा. शास्त्रानगर, कडगाव)
याच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे.

प्रेम शनिवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरासमार असताना मनाज तेथे आला. त्याने पूर्ववैमनस्यातून प्रेमचा लहान भाऊ प्रतीक साठे यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रेम त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोज शिरसाठ (वय ३४ रा. शास्त्रीनगर,केडगाव) यांच्या फिर्यादीवरून प्रेम जितेंद्र साठे (रा. समतानगर,कडगाव) व दोन ते तीन अनोळखा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज ह शनिवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरासमोर उभे असताना प्रेम हा त्याच्यासोबत दोन ते तीन अनोळखी इसम घेवून आला. त्यांनी पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करून मारहाण केली. प्रेमने कोयत्याने मारहाण केल्याचेफिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles