Tuesday, June 25, 2024

Ahmednagar news:माझ्या नवऱ्यासोबत राहायचे नाही, म्हणत महिलांची एकीला मारहाण

प्रतिनिधी | नगर त्याच्यासोबत’भीमा, हा माझा नवरा असून,तू राहायचे नाही’ असे म्हणत तीन महिलांनी एका महिलेला घरात घुसून लाथा-बुक्क्यांनी
मारहाण केली. मंगळवारी (२१ मे) रात्री आठ वाजेच्या सुमारास केडगावातील अर्चना हॉटेलमागे ही घटना घडली. याप्रकरणी अर्चना हॉटेलमागे राहणाऱ्या महिलेने मंगळवारी रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून लोंढे मळा,केडगाव येथे राहणारी महिला, नेप्ती रस्ता लालानगर येथे राहणारी दुसरी महिला व एक अनोळखी महिला, अशा तिघींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री फिर्यादी महिलेच्या घरात घुसून ‘भिमा हा माझा नवरा आहे, तू माझ्या नवऱ्यासोबत राहायचे नाही’ असे सांगितले. त्यावर फिर्यादी महिलेने ‘भिमा माझा नवरा आहे’ असे सांगितले.

त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी फिर्यादीस शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोडला. ‘तुझा मोबाईल फोन माझ्या घरी येऊन घेऊन जा’ असे म्हणून त्या फिर्यादीचा मोबाईल घेऊन गेल्या. अधिक तपास अंमलदार गिरीषकुमार केदार करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles