Tuesday, April 23, 2024

केडगाव येथील शाहूनगर मध्ये अवतरले श्रीराम दूत हनुमान

भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ व समस्त खाकाळ परिवार आयोजित रंगला हनुमान चालिसा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, समस्त खाकाळ परिवार, ओंकार नगर मित्र मंडळ व शाहूनगर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाने (सर्जेपुरा) सादर केलेल्या या भक्तीमय कार्यक्रमात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. रात्री उशीरा पर्यंत भजन संध्येने या कार्यक्रमाची रंगत वाढविल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय बनले होते. या कार्यक्रमात साईबाबांचे भक्ती गीत व श्रीराम, सीता, लक्ष्मीण, हनुमान यांच्या रुपात अवतरलेल्या भाविकांनी सर्वांचे लक्ष वेधले. या भावभक्तीचा महोत्सवात भाविकांनी तल्लिन होऊन भक्ती गीतावर ठेका धरला होता. यावेळी उद्योजक सचिन कोतकर, उद्योजक विनोद मुनोत, नानासाहेब भवर, विक्रम लोखंडे, बलभीम कर्डीले, राजन कुलकर्णी, सचिन कुलथे, भाऊसाहेब जाधव, गायके साहेब, अभय वाघमारे, अमृत क्षीरसागर, आकाश ढुमने आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उद्योजक जयद्रथ खाकाळ, युवा उद्योजक योगेश खाकाळ, प्रदीप खाकाळ संपूर्ण खाकाळ परिवाराचे सहकार्य लाभले. भाविकांना यावेळी प्रसादचे वाटण्यात करण्यात आले. उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम व हनुमानजींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles