Tuesday, February 18, 2025

नगरमध्ये केळी व्यापाऱ्याचे ऑफीस फोडून रोकड लंपास, कोतवाली पोलिसांनी 2 तासांत आरोपी पकडला..

केळी व्यापा-याचे ऑफीस फोडुन रोख रक्कम चोरणा-या चोरट्यास कोतवाली पोलीसांकडुन २ तासात मुद्देमालासह ताब्यात

दि १९/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे सागर मिलींद गायकवाड वय २४ वर्ष रा दुधसागर सोसायटी केडगाव अ नगर यांनी फिर्याद दिली की, दि १७/०७/२०२४ रोजी सकाळी ०६/३० वा च्या सुमारास त्यांचे केळीचे गोडावून चे ऑफीस बंद करुन मार्केटला गेले असता त्यांचे गोडावून चे आँफिस अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन गल्यातील १ लाख १० हजार रुपये चोरुन नेले आहेत अशी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 1 ८१४/२०२४ बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मा. पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास करणे बाबत आदेशीत केल्याने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांचे कडे काही दिवसा पूर्वी काम सोडुन गेलेला कामगार यानेच केला असावा त्या प्रमाणे तपास केला असता काम सोडुन गेलेला कामगार नामे चंद्रकांत दिगंबर इंगळे रा दुधसागर सोसायटी केडगाव अ नगर याचा शोध घेवुन त्याचे कडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्याने मला काही एक माहीत नाही असे सांगीतले त्या नंतर पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व लपवुन ठेवलेले १ लाख १० हजार रुपये पंचासमक्ष काढुन दिले आहेत. तरी पुढील तपास पोना योगेश कवाष्टे करित आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचेमार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे सो पोसई प्रवीण पाटील व गुन्हेशोध पथकाचे पोहेकाँ योगश भिंगारदिवे, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोहेकाँ सुर्यकांत डाके, पोहेकाँ विक्रम वाघमारे, पोना अविनाश वाकचौरे, पोना सलीम शेख, पोकाँ अभय कदम, पोकाँ अमोल गाडे, पोकाँ सतिष शिंदे, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ तानाजी पवार यांनी सदरची कारवाई केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles