नगर : केडगाव उपनगराचा विकास कामामुळे झपाट्याने विस्तार होताना दिसत आहे, चांगले काम उभे राहत असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास येत असून रोज नवनवीन कॉलनी उभी राहत आहे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या दूरदृष्टीमुळे केडगावकरांचा बिकट पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्यामुळेच उपनगराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे केडगाव उपनगराचे प्रलंबित विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने निधीही उपलब्ध होत आहे या कामासाठी खा. डॉ.सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभत आहे केडगावच्या शाश्वत विकासासाठी नियोजनबद्ध व दर्जेदार कामे सुरू आहेत केडगाव मधील नागरिकांना विश्वासात घेऊन कामे मार्गी लावली जात आहे असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केल.
प्रभाग क्रमांक 17 मधील केडगाव दूध सागर सोसायटी येथे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गणपती मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मा. नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे ,गौरी नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नन्नावरे, दलित आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील उमाप, सुनील कोतकर ,सोनू घेंबुड, सुमित लोंढे, संदीप कोतकर युवा मंच अध्यक्ष भूषण गुंड, संचालक बापू सातपुते ,माजी संचालक बहिरू कोतकर, चेअरमन अनिल ठुबे, भरत ठुबे ,पोपटराव कराळे, अशोक कराळे, पंकज जहागीरदार, प्रवीण सुंबे, किसन क्षीरसागर, पाराजी आटकर, सागर सुंसुळे, अतुल जगताप, सौरभ सुंसुळे, रमेश रोडे, सुशील चव्हाण, रामा नेटके, सुहास परदेशी, गणेश शेलार, ऋषिकेश मिसाळ यांसह जागृती मित्र मंडळ दूध सागर सोसायटी परिसरातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर म्हणाले की दूध सागर परिसरातील गणपती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यासाठी मोठ्या संख्येने भावीकवर्ग उपस्थित असतात, त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. डॉ,सुजय विखे पाटील यांच्या निधीतून सभा मंडपाचे काम सुरू झाले आहे. तसेच नागरिकांमध्ये धार्मिक तिची गोडी निर्माण होण्यास मदत होत असते. माजी महापौर संदीप कोतकर यांनी पाणी योजना मागील लावले असल्यामुळेच या परिसराच्या विकासाला गती प्राप्त झाले आहे. एक एक प्रश्न हाती घेऊन मार्गी लावली जात आहे असे ते म्हणाले
यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांचे भाषण झाले.
चौकट : केडगाव मधील नागरिकांना एकत्रित करून भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावचे कोथरूड करण्याचे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी उद्योजक सचिन कोतकर प्रयत्न करत आहेत. केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी कोतकर कुटुंब यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन आंबेडकर चळवळीचे नेते सुनील उमाप यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब वायकर यांनी केले, आभार प्रवीण सुंबे यांनी मांडले
केडगावकरांचा बिकट पाणी प्रश्न मा.महापौर संदीप कोतकर यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी
- Advertisement -