लग्नातील नवरी नवरदेवाच्या उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे ऐकून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक जुना उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ लग्नातील आहे. हळदीच्या कार्यक्रमाच्या वेळी नवरा नवरी खाली बसलेले असतात. नवरीसह तिथे असलेल्या सर्व महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसलेल्या असतात. या महिला नवरदेवाला नवरीचं नाव घेण्याचा आग्रह करतात तेव्हा नवरदेव उखाणा घेतो.
नवरदेवाचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
नवरदेव म्हणतो, “नाव घ्या नाव घ्या.. हा काय कायदा, नाव घ्या नाव घ्या.. हा काय कायदा; कल्पनाचं नाव घेतो, तुमचा काय फायदा..”
हा उखाणा ऐकून बाजूला बसलेली नवरी आणि सर्व महिला जोरजोरात हसायला लागतात.