भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे लक्षवेधी असून, डान्सच्या स्टेपदेखील सुंदर आहेत. यावेळी किली पॉल खूप सुंदर डान्स करताना दिसतोय. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘ट्रेंडिंग’ असे लिहिलेले दिसत आहे.
Video: किली पॉलचा ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ गाण्यावर हटके डान्स
- Advertisement -