भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. अशात सर्व भारतीय १४ एप्रिलला जयंती साजरी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक तरुण तरुणी बाबासाहेबांच्या गाण्यांवर रील व्हिडिओ पोस्ट करत आहेत. अशात टांझानियामधील प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएंसर किली पॉल याने देखील भीम गितांवर रील व्हिडिओ बनवला आहे.
भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं या गाण्याने सर्वच भारतीयांना भूरळ घातली आहे. बाबासाहेबांची जयंती म्हटल्यावर अनेकजण हे गाणं गुणगुणतात. आता किली पॉलला देखील या गाण्याची भूरळ पडलीये. त्याने स्वत: या गाण्यावर रील व्हिडिओ शूट केलाय. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत जयंतीला फक्त ४ दिवस शिल्लक असल्याचं म्हटलं आहे
Video : किली पॉलला भीमगीतांची भुरळ; भीमजयंतीची आठवण करून देणारा रील
- Advertisement -