उत्तम अभिनेत्री व ‘लावणी क्वीन’ म्हणून मेघा घाडगेला ओळखलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या मेघा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मेघाने रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओत अभिनेत्री आजारी असून तिच्यावर उपचार चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “बुखार! ३१st येतोय..किंग करोना परत आलाय प्लीज काळजी घ्या! मित्र-मैत्रिणींनो २०२४ या वर्षांत तुम्हाला सुख, समृद्धी लाभो आणि भरभरून यश मिळो!”