मराठी अभिनेते किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी किरण माने यांनी अत्यंत मोठे विधान केले. किरण माने म्हणाले की, शिवसेना सर्वसामांन्याची आहे. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून त्यांचासोबत येण्याचा निर्णय घेतला.
किरण माने हे म्हणाले की, संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करीन. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बीडच्या निर्भिड शिवसैनिकांनो युतीमुळे आणि मुंडे साहेबामुळे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता पालवी फुटत आहे. त्याचा वृक्ष होत आहे. मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार.