मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष विशिष्ट पद्धतीने काम करत असतो. अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. न्यायालयात खटला सुरू असताना त्यावर बोलणे बरोबर नाही, असे मत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशावर व्यक्त केले आहे.
गेली काही दिवस अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजप नेते किरीट सोमय्या यांना ट्रोल करण्यात येत आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांनी आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीचा सरकारमधील समावेशावर, किरीट सोमय्या अखेर बोलले….
- Advertisement -