दूध उकळताना उतू जाऊ नये याची काळजी घेणे हे त्यातलंच एक.. अशी लहान मोठी आव्हानं पुर्ण करत गृहिणी रोजचा स्वयंपाक करतात. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या ६ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे दूध ओतू जाऊन गॅस, ओटा खराब होण्याचं टेन्शन दूर होणार आहे. आता दूध तापत आलंय, एका मिनिटात गॅस बंद करायचाय अशी आपल्या मेंदूने नोंद पण घेतलेली असते. पण तितक्यात काहीतरी कारणाने क्षणभरासाठी आपण वळतो आणि भसाभस दूध ऊतू जातं… एक सोपी ट्रिक…याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
तुम्हाला फक्त दुधाच्या भांड्याला बाजूनं बटाटा कापून लावायचा आहे. बटाटा कापल्यानंतर बटाट्यामधून जे द्रव बाहेर येत ते दुधाच्या भांड्याला गोल लावून घ्यायचं आहे. यामुळे तुमचं दूध यापुढे कधीही उतू जाणार नाही . बटाट्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. @AvikaRawatFoods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.