एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.
आतापर्यंत तुम्ही बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले असतील. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. पण हाच बटाटा तुमचं लाइट बिल कमी करू शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
सर्वात आधी बटाटा कापून घ्या त्यानंतर तो फ्रिजरमध्ये चोळून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे.