गरम तवा, त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे. एकदा का तुम्ही पाहाल तर वारंवार हा उपाय कराल. चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात. यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता.
- Advertisement -