व्हिडीओमध्ये गृहिणीने किचनमध्ये वापरता येईल अशी जादूची पोटली दाखवली आहे.आपण वर्षभरासाठी आपण तांदूळ आणतो आणि अगदी सगळी काळजी घेऊन साठवून ठेवतो. पण काही काळाने कधीतरी चुकून ओला हात लागतो किंवा तांदूळ भरताना काहीतरी राहून जातं आणि मग तांदळात किडे, अळ्या होण्यास सुरुवात होते. याचा लगेचच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग तांदूळ साफ करणं कठीण होऊन जातं.
यासाठीच या गृहिणीने त्या पोटलीत पुदीन्याची पानं ठेवली आहेत. पुदिन्याच्या पानांमुळे तुमच्या तांदळाला कधीच कीड लागणार नाही किंवा अळ्या होणार नाहीत. मात्र यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ही पुदिन्याची पानं आधी कडक उन्हात वाळवून घ्या त्यानंतर एका कपड्याची पोटली बांधा आणि तांदूळ घरी आणल्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवा. आधीपासून जरी तांदळात किडे असतील तरीही एका रात्रीतच हे सगळे किडे वासामुळे वर येतील.